‘भाई तेरा स्टार है’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पुण्यात राघव जुयाल, निहारिका एनएम आणि विकल्प मेहता यांचे भव्य स्वागत
'भाई तेरा स्टार है' चित्रपटाच्या टीमने पुण्यातून आपल्या प्रमोशन टूरची सुरुवात केली. यावेळी अभिनेता राघव जुयाल, निहारिका एनएम आणि विकल्प मेहता यांचे चाहते आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात स्वागत केले.
पुणे: दिवसाची सुरुवात ‘डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’ला दिलेल्या भेटीने झाली. तिथे उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रचंड गर्दीने या तिघांचे जोरदार स्वागत केले. कलाकारांनी उपस्थितांशी संवाद साधला, ‘भाई तेरा स्टार है’ चित्रपटाबद्दल गप्पा मारल्या आणि शूटिंगदरम्यानचे काही मजेदार किस्से शेअर केले. या वेळी संपूर्ण कॅम्पस चाहत्यांच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
पुण्याच्या संस्कृतीचा आस्वाद घेत राघव, निहारिका आणि विकल्प यांनी पुण्यातील प्रसिद्ध मिसळवर ताव मारला. या तिघांनी शहराच्या या लाडक्या खाद्यपदार्थाचा आनंद घेत.
एकमेकांसोबत काही निवांत क्षण घालवले आणि पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेतला.
दिवसभराच्या कार्यक्रमानंतर, ‘भाई तेरा स्टार है’च्या टीमने पुण्यातील प्रमोशनचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि पुढील प्रमोशनसाठी जयपूरकडे प्रस्थान केले.
विवेक बी. अग्रवाल दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन सुदीप्तो सरकार आणि विवेक बी. अग्रवाल यांनी केले आहे. तसेच अवंतिका हरी, सुनील रुपाणी आणि विवेक बी. अग्रवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘भाई तेरा स्टार है’ हा चित्रपट ३० जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Comments are closed.