प्रभाग २४ मध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा गणेश बिडकरांना पाठिंबा देत भाजपमध्ये प्रवेश, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या ओढा भाजपकडे!
पुणे: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. यानंतर आता प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांचा ओढा सध्या भाजपकडे वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, निवडणूक प्रमुख व प्रभाग क्रमांक 24 चे उमेदवार गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये पुणे महानगरपालिका मनसे कामगार आघाडीचे प्रमुख रितेश शिकोत्रे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी भगवान श्री जाहर विर गोगाजी सेवा समिती व महाराष्ट्र महर्षी वाल्मिक महाराज संघटना त्यांच्या वतीने देखील भारतीय जनता पार्टी व गणेश बिडकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.
प्रभाग क्र. २४ चे उमेदवार मा. स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर हे प्रभागासाठी तसेच शहरासाठी करत असलेले काम, त्यांची समाजासाठी असणारी तळमळ हे सर्व पाहुन संघटना व समिती मार्फत संपूर्ण ताकदिसह त्यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचे यावेळी अध्यक्ष रितेश शिकोत्रे म्हणाले.

Comments are closed.