मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी अजित पवारांची पुण्यात महत्वाची बैठक

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडल्यानंतर अजित पवारांनी आपला मोर्चा आता पुणे शिरूरकडे वळविला आहे. आज पुणे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी अजित पवारांनी पुण्यात महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मुरलीधर मोहोळ, रूपाली चाकणकर, दिपक मानकर, चेतन तुपे आणि प्रदीप देशमुख उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी पुण्यातील मतदारांशी संवाद साधत जनसंपर्क वाढवण्याचे आदेश दिलेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर आता पुणे आणि शिरूरमध्ये येत्या १३ तारखेला मतदान होत आहे. याच अनुषंगाने अजित पवारांनी पुण्यातील अंबड बॅक्वेट वारजे येथे महायुतीच्या नेतमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी पुण्यातील मतदारांशी संवाद साधत जनसंपर्क वाढवत जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रयत्न करण्याचे अजित पवारांनी आवाहन केले.

त्याचबरोबर संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रीत करत मोदी आणि महायुती सरकारच्या योजना तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचिवण्यासाठी कार्यरत राहण्याच्या सुचनाही अजित पवारांनी यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. यातच मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात अजित पवार यांच्या सभा देखील येत्या एक दोन दिवसात पार पडणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

Leave A Reply

Translate »