गावच्या विकासासाठी, निधी कमी पडू देणार नाही – शिवाजीराव आढळराव पाटील

पुणे : शिरूर मतदारसंघात लोकसभेच्या प्रचाराने वेग घेतला आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे झंझावाती गाव दौरे सुरू आहेत.  वाडा गावाशी माझे अनेक वर्षांचे ऋणानुबंध राहिले आहेत. अनेक कामे येथे मार्गी लावली. विविध योजना लागू केल्या. खासदार नसतानाही इथे आलो आहे. भविष्यातही गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. येथे निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वाडा ग्रामस्थांना दिली.

वाडा येथील श्रीराम मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तन सोहळ्यानिमित्त त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी अनेक भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

दिलीप मोहिते-पाटील म्हणाले की, आढळराव यांनी वाडा गावच्या विकासासाठी विविध प्रकारचा निधी पोहोचवला आहे, प्रत्यक्ष काम करणारा माणूस आज तुमच्यासमोर उभा आहे, देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना बनवायचे आहे. त्यासाठी आढळराव यांना निवडून देणे महत्त्वाचे आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांगरे, माजी संचालक शेखर शेटे, माजी सभापती काळूराम सुपे, जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे, माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र काजखिले, लहुजी वस्ताद संघटनेचे अध्यक्ष शिवाजी राजगुरू, वाडा गवच्या सरपंच रूपाली मोरे, सरपंच रोहिदास शेटे, वाडा ग्रामस्थ, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Translate »