सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र ही कोरोना महामारी नैसर्गीक नसून ती मानव निर्मित असल्याचा दावा लेखक, दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांनी विविध पुराव्यांच्या आधारे केला आहे. याच धर्तीवर आंग्रे यांनी ‘दी डॉग्ज सेपरेशन” हा सत्य घटनेवर आधारीत सस्पेन्स थ्रीलर हिंदी चित्रपट तयार केला असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

‘डीप सी मुव्हीज’ची निर्मिती असलेल्या ‘दी डॉग्ज सेपरेशन’या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांनी केले आहे. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, कोरोना महामारीने संपूर्ण जागावर व परिणामी नागरिकांवर खोलवर परिणाम केले आहेत. कोरोना नंतर जसे चांगले बदल झाले तसेच काही वाईट परिणाम देखील झाले. घटस्फोट घेण्याकडे, एकटे राहण्याकडे  तसेच  विना आपत्य वैवाहिक आयुष्य जगण्याकडे लोकांचा कल वाढला आहे; असे जागतिक आकडेवारी वरून सिद्ध आले आहे. अन् याच मुद्द्यावर ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा  चित्रपट भाष्य करतो. 

या चित्रपटासाठी रिसर्च करताना अशा अनेक बाबी लक्षात आल्या की ज्यावरून असे दिसून येते की ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायसेशन’ (WHO)ला या महामारीबद्दल आगोदार पासून माहिती होती अन् त्यांनी यासाठी एक प्रोग्राम देखील राबविला होता. अशा अनेक सत्य घटनांचा संदर्भ घेत कोरोना महामारी कशी नैसर्गीक नसून ती मानव निर्मित आहे, हे समजावून सांगण्याचा  हा चित्रपट प्रयत्न करतो, असे ही दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांनी सांगितले.       

एका हाय प्रोफाईल घटस्फोटा पासून सुरू होणारी ही कथा आहे. जी मायक्रोसॉफ्ट चे सर्वेसर्वा  बिल गेट्स यांच्या घटस्फोटाशी मिळती जुळती आहे. पुढे ही कथा कोणत्या वळणावर कशा प्रकारे या सत्य घटनांचा खुलासा करत पुढे जाते, हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत तयार करण्यात आला असून याला इंग्लिश सबटायटल असणार आहेत. तसेच यामध्ये अभिनेता आदित्य अलंकार, लीना नंदी, मिथिला नाईक, त्रिशन कुमार, केतन महाजन, नूपुर पंडित, निखिल घमरे, शुभम साखरे, तनिष्क खन्ना, दीपक जोशी, सुवदन आंग्रे, रोहन लोलगे, अभिर आणि आयुष चिंचाळकर आणि जिमी-द डॉग आदी कलाकारांनी काम केले आहे. संगीत संगीतकार युग भुसाळ यांचे असून निर्माती म्हणून दीपाली आंग्रे यांनी जबाबदारी पेलली आहे.

Leave A Reply

Translate »