विद्यार्थी केंद्रित शिक्षणाची गरज – कोटा येथील सुप्रसिद्ध एनव्ही सरांचे प्रतिपादन

– विमान नगर येथे मोशन क्लासेसच्या शाखेचे उद्घाटन संपन्न

पुणे : देशपातळीवर  12 वी सायन्सच्या नंतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी विद्यार्थी केंद्रीत  शिक्षण महत्वाचे आहे. बोर्ड, निट आणि जेईई परीक्षेसाठी फिजिक्स, केमिस्ट्रीचा अभ्यासक्रम एकाच आहे, मात्र प्रत्येक परीक्षेसाठी तयारी करताना त्याचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रम शिकविण्याची गरज आहे असे मत कोटा येथील सुप्रसिद्ध मोशन क्लासेसचे संस्थापक नितीन विजय अर्थात एनव्ही सर यांनी केले. 

पुण्यातील विमान नगर येथे मोशन क्लासेसच्या शाखेचे उद्घाटन आज करण्यात आले यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना  एनव्ही सर बोलत होते. यावेळी विमान नगर फरांचायसी चे नितीन भुजबळ, गौरव शर्मा आदि मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना एनव्ही सर म्हणाले, मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आहे, अभ्यासातही मी टॉपर नव्हतो, मात्र शिक्षणावर सर्वांचा अधिकार आहे, शिक्षणाचे विकेंद्रीकरण आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती झाली पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. जे विद्यार्थी अभ्यासात चांगले आहेत, टॉपर आहेत त्यांच्यावर शिक्षक अधिक लक्ष केंद्रित करतात मात्र आम्ही सामान्य विद्यार्थी टॉपर कसा होईल यावर काम करत आहोत. याबरोबरच सर्वांच्या आवाक्यात शिक्षण आले पाहिजे यास्तही आम्ही प्रयत्नशील आहोत यामुळेच आम्ही शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देण्यावर भर देत आहोत. 

यावेळी एनव्ही सर यांनी क्लासेस माध्ये प्रवेश घेण्यासाठी फी मध्ये सवलत मीविण्याचा विविध स्कॉलरशिप आणि लॉटरी पद्धतीची माहिती दिली. तसेच शिक्षक निवडण्याची पद्धत सांगितले. तसेच कोटा येथे मागील काही काळात झालेल्या आत्महत्या या दुर्दैवी असून, या घटना क्लासेसच्या दबावामुळे नव्हे तर स्ट्रेस किंवा अन्य कारणामुळे झाल्याचे नमूद केले. अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी उपाययोजना सुरू असल्याचेही एनव्ही सरांनी सांगितले. 

नितीन भुजबळ म्हणाले, कोटा येथे आम्ही अनेक क्लासेसला भेट दिली त्यामध्ये अनेक मोठे ब्रॅंडस होते. मात्र विद्यार्थी केंद्रीय शिक्षण देण्याचा एनव्ही सरांचा मानस आणि शिक्षणाला तंत्रज्ञानाची दिलेली जोड या बाबी आम्हाला मोशन मध्ये आहेत यांची जाणीव झाली यामुळे आम्ही त्यांच्याशी जोडले गेलो. पुण्यात आणखी विस्तार करण्याचा आमचा मानस असून भविष्यात तीन ते चार ठिकाणी शाखा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. 

भारतातील पहिले ‘मिरॅकल मशीन’ 

मोशन क्लासेसच्या वतीने प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण कोणत्या विषयात कमजोर आहोत, आपल्याला सुधारणा करण्यासाठी काय करायला हवे हे जाणून घेण्यासाठी एक एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने  ‘मिरॅकल मशीन’ तयार करण्यात आले आहे. हे मशीन अॅप च्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे जेणेकरून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वांना आपण काय करायला हवे हे समजण्यास मदत होणार आहे. या मशीन मध्ये विद्यार्थ्याने आपला रोल नंबर टाकला की क्लासमध्ये ज्या टेस्ट दिल्या आहेत त्यातील विद्यार्थ्यंने केलेल्या चुका विषयानुसार दिसतात, तसेच ते पालक सुद्धा बघू शकतात विद्यार्थ्याला एक प्रिंट आऊट या मशीन मधून मिळते ज्यात काय चुकले आणि सुधारण्याची संधी कुठे आहे याचे विश्लेषण दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांना आपला पेपर सेट करता येतो त्यांची काठिण्यपातळी ठरवता येते भारतात एकमेव मोशन क्लासेस मध्येच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

शुक्रवारी  एनव्ही सरांचे मोफत मार्गदर्शन 

नितीन विजय अर्थात एनव्ही सरांची देशपातळीवर करिअर गाईडन्स आणि मोटीवेशनल स्पीकर अशी ओळख आहे. एनवही सरांचे शुक्रवारी पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन शिबिर मोशन क्लासेस, बी – 303 न्याती इम्प्रेस, विमान नगर येथे सायंकाळी 4.30 वा. होणार आहे, या मार्गदर्शन शिबिरासाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश आहे, असे नितीन भुजबळ यांनी सांगितले.

Leave A Reply

Translate »