परांजपे मराठी प्राथमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

पुणे: शालेय स्तरावरील विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन महत्वपूर्ण आहेत.
गुणवत्ता,तसेच व्यक्तीमत्व विकासाची पायाभरणी याच काळात होते.असे मत व्याख्याते लक्ष्मण जाधव यांनी महाराष्ट्र विद्या मंडळाच्या परांजपे मराठी प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर व्याख्याते, निवेदक लक्ष्मण जाधव, उपक्रमशील शिक्षक रणजित बोञे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा भोसले या उपस्थित होत्या.

यावेळी शालेय स्तरावरील आयोजित वक्तृत्व स्पर्धा,कथाकथन स्पर्धा, निबंध स्पर्धा नृत्य स्पर्धा तसेच मैदानी स्पर्धेतील धावणे स्पर्धा,लिंबु चमचा,खो-खो अशा विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील गुणांची पारख करत त्यांना प्रोत्साहन दिले तर विद्यार्थ्यांचं उद्याच भविष्य हे नक्कीच उज्वल ठरणार आहे.यासाठी शाळेतील शिक्षकांची भुमिका महत्वाची असते.अशी भावना जाधव यांनी व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षिकांचे सहकार्य मिळाले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विष्णू गवारी यांनी केले तर वैशाली देशमुख यांनी आभार मानले.

Leave A Reply

Translate »