सामाजिक उपक्रमांसाठी ‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ चे आयोजन

पुणे : कशिश प्रॉडक्शन्सच्या वतीने ‘MR, MISS, MRS. GLOBAL MAHARASHTRA’ आणि लहान मुलांसाठी ‘RISING STAR’ या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. या शो मधून जमा होणारा निधी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेसाठी वापरला जाणार आहे. या फॅशन शो च्या माध्यमातून  दुर्गम भागातील महिलांना सॅनेटरी  नॅप्किन्स चे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती कशिश प्रॉडक्शन्सचे अध्यक्ष आणि पुण्याचे ‘पॅड मॅन’  योगेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ झालेल्या या पत्रकार परिषदेला नम्रता काळे,अंजली रघुनाथ वाघ,प्रियंका मिसाळ,वैशाली भारद्वाज,झहीरा शेख आदी  मान्यवर उपस्थित होत्या.

फॅशन शो बद्दल योगेश पवार म्हणाले, आम्ही सातत्याने महिलांच्या आरोग्या विषयीचे विविध उपक्रम राबावत असतो. ‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ या स्पर्धेत भाग घेण्यासाठी राज्यभरातून आलेल्या एंट्रीज मधून  स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. सौंदर्य स्पर्धा म्हटंले की सहभागांसाठी अनेक निकष लावले जातात. पण या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वय, वजन, ऊंची याचे कोणतेही निकष लावण्यात आलेले नाही. ही स्पर्धा सगळ्यांसाठी खुली असणार आहे. या Mr, Miss,Mrs. स्पर्धेसाठी कोणतीही वयोमार्यादा ठेवण्यात आलेली नाही. तसेच RISING STAR या लहान मुलांच्या स्पर्धेत लहान मुलं भाग घेवू शकतात. अधिक माहितीसाठी 9049505859 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन योगेश पवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Translate »