एस. पी. इंटरनॅशनल कॉलेज मध्ये विज्ञानवादी नागपंचमी साजरी

पुणे:अमर एज्युकेशन सोसायटीचे आंबेगाव पठार, पुणे स्थित “एस. पी. इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेज” मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून नागपंचमी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी झाली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी विविध सर्प व नागाच्या प्रकारांबद्दल माहिती दिली. आपण सापाला घाबरतो परंतु त्यांचे निसर्ग चक्रात योगदान अनमोल आहे.प्रत्येक साप हा काही विषारी नसतो, त्यामुळे एखाद्याला जर साप दिसला तर घाबरून न जाता सर्पमित्राला बोलवावे, असे मुख्याध्यापिका पल्लवी सोकंडे म्हणाल्या. तसेच भारतीय संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकाने घरोघरी विज्ञानवादी नागपंचमी साजरी करावी, असे आवाहन संस्थेच्या सचिव मंगलताई सोकांडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी नागाच्या प्रतिकृती बनवल्या व प्रबोधनात्मक गीते सादर केली.

Leave A Reply

Translate »