ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

नुक्कड नाटिकेच्या माध्यमातून जागृतीः मोबाइलच्या आहारी जाऊ नका व आरोग्यास हानिकारण खाद्य पदार्थांचे सेवन टाळा

पुणे: विद्यार्थ्याना स्वातन्त्र्यदिनाचे महत्व समजावे आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढावी हा मुख्य उद्देश ठेऊन मालपाणी फाउडेशनचे सुस येथील ध्रव ग्लोबल स्कूलमध्ये दरवर्षी अनोखा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून स्कूलमध्ये प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. या वर्षी ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थीनी निर्जरा राऊत हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी, स्कूलच्या प्रिन्सिपल संगीता राऊतजी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
तत्पूर्वी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम आणि जय हिंदच्या घोषणा देत बाणेर येथे प्रभात फेरी काढली. पथनाट्याच्या माध्यमातून मोबाईलचा अतिवापर आणि आरोग्यास हानिकारक अशा खाद्यपदार्थाचे सेवन टाळण्यासाठी जागृती करण्यात आली.
यश मालपाणी म्हणाले,” स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार आजच्या युवकांनी खेळाच्या मैदानात उतरून स्वतःला सशक्तआणि सक्षम बनवावे , त्याचप्रमाणे स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे चालावे. स्वतःमध्ये विशेष शक्ती आहे हे लक्षात ठेऊन कठोर परिश्रम करावे. नेमबाजी, जलतरण व इतर क्षेत्रात ध्रुव ग्लोबल स्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे आणि पुढेही करतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर झालेल्या कार्यक्रमात ध्रुव ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी कारगील विजय दिवस आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले, यामध्ये नृत्य आणि समूहगान यांचाही समावेश होता. प्रशालेमध्ये दहावी मध्ये द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या दैविक गुप्ता व मयंक उप्पल त्याच प्रमाणे अनुष्का सक्सेना, स्वरा मार्केंडे व अद्विका जोशी (इंग्रजी), दिशा लोया, निर्जरा राऊत (विज्ञान , हिंदी आणि समाजशास्त्र) मयंक उप्पल, दिशा लोया, (हिंदी),अनुष्का सक्सेना व स्वरा मार्कंडे (जर्मन), दैविक गुप्ता(गणित आणि संस्कृत),जिया मालपाणी (मराठी), आणि मयंक उप्पल (समाजशास्त्र) या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच संगीता राऊतजी यांनी ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्व विद्यार्थ्यांना अथक परिश्रम करण्याचा सल्ला दिला.

Leave A Reply

Translate »