बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ११ जून रोजी होणार फिटजी टॅलेंट रिवॉर्ड परीक्षा (FTRE)

जेईई मेन ॲडव्हान्समध्ये यश मिळवण्यासाठीचा उपक्रम

पुणे– जेईई मेन/ॲडव्हान्स, बिटसॅट आणि एमएचटी सीईटी २०२३ मध्ये यश मिळविण्याबाबत कमी आत्मविश्वास असलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करावे? या विचारात किंवा आत्मपरीक्षण करण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालविण्यापेक्षा फिटजी च्या परिवर्तनीय अभ्यासक्रमात सामील व्हावे. असे आवाहन फिटजी संस्थेतर्फे करण्यात आले आहे. यासाठी संस्थेने बारावी पास किंवा उपस्थित विद्यार्थ्यांसाठी जेईई मेन ॲडव्हान्समध्ये यश मिळवण्यासाठी शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा ऑफलाइन रिपीटर प्रोग्राम डिझाइन केलेला आहे. ‘फिटजी टॅलेंट रिवॉर्ड एक्झाम’ (FTRE)च्या रूपाने या सर्व विद्यार्थ्यांना जेईई २०२४ ची आणखी एक संधी वाट पाहत आहे.

फिटजी पुणे केंद्र प्रमुख राजेश कर्ण म्हणाले कि, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयआयटी/एनआयटी/आयआयआयटी/जीएफटीआय किंवा इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास टॅलेंट रिवॉर्ड परीक्षा अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. फिटजीने अशा सर्व विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, ‘फिटजी टॅलेंट रिवॉर्ड एक्झाम’ ची रचना केली आहे – विद्यार्थ्यांना जेईई २०२४ यशासाठी विशेष मार्गदर्शन याद्वारे होणार आहे. या परीक्षेतील यशाच्या आधारे विद्यार्थ्यांना जेईई मेन / जेईई ॲडव्हान्ससाठी त्यांचा रँक पोटेन्शियल इंडेक्स (RPI) आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना काय करण्याची आवश्यकता आहे हे कळते. तसेच विद्यार्थ्यांना फिटजी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या “जेईई मधील यशाचे विज्ञान” या विषयावरील कार्यशाळेचाही लाभ मिळणार आहे. फिटजी टॅलेंट रिवॉर्ड परीक्षा रविवार ११ जून रोजी होणार असून गुणवंत विद्यार्थ्यांना शुल्कमाफी बरोबर शिष्यवृत्ती देखील मिळणार असल्याची माहिती कर्ण यांनी दिली. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अधिक माहितीसाठी फिटजीच्या स्वारगेट केंद्राला अथवा www.fiitjeepune.com या संकेतस्थळाला भेट दयावी.

Leave A Reply

Translate »