नंदकिशोर कोतकर यांची इशरे पुणेच्या अध्यक्षपदी नियुक्ती

पुणे: इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रिजरेटींग अ‍ॅन्ड एअरकंडिशनिंग इंजिनिअर्स (इशरे) या संघटनेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी नंदकिशोर कोतकर यांची निवड करण्यात आली आहे. इशरे या नामांकित तांत्रिक संघटनेच्या पुणे विभागाच्या नवीन कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. नविन कार्यकारिणीमध्ये सचिव सुभाष खनाडे, कोषाध्यक्ष चेतन ठाकूर व इतर सदस्यांचा समावेश झाला. यावेळी इशरे पुणे शाखेचे कार्यकारणी मंडळ मधील वीरेंद्र बोराडे माजी अध्यक्ष, आशुतोष जोशी नियुक्त अध्यक्ष  व इतर सहकारी उपस्थित होते.

पदग्रहण कार्यक्रमाला इशरेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष एन एस चंद्रशेखर, राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध तांत्रिक सल्लागार व राष्ट्रीय अध्यक्ष असोचेम जेम पंकज धारकर व पुणे इशरेचे प्रथम अध्यक्ष आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद सुरंगे, प्रख्यात तांत्रिक सल्लागार आर एस कुलकर्णी, प्रख्यात रेफ्रिजरेशन तज्ञ रमेश परांजपे, राष्ट्रीय अध्यक्ष (आरएटीए) मिहीर सांगवी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष इशरे विक्रम मूर्ती, इशरे पश्चिम १ विभागीय संचालक मनीष गुलालकरी, रेफकोल्ड चेन्नईचे अध्यक्ष राजा श्रीराम, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड विजेती आणि सायकलस्वार प्रीती म्हस्के, केंद्र सरकारचे अग्निशमन सल्लागार डिके शमी, गोवा फायर सर्व्हिसेस माजी संचालक अशोक मेनन, फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजित राघवन, फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया कोषाध्यक्ष दिपेन मेहता, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, प्रशांत रणपिसे इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून NICMAR विद्यापीठाचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ.अनिल कश्यप उपस्थित होते.  

इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशन इंजिनियर्स पुणे शाखेच्या ३१  व्या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि समितीच्या शपथविधी सोहळा नुकताच वाकड येथील हॉटेल टीप टॉप येथे पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष वीरेंद्र बोराडे म्हणाले की, पुणे शाखेच्या वतीने गेल्या वर्षी पर्यावरण संरक्षणासाठी इशरेतर्फे भरपूर योगदान आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षी पृथ्वी पर्यावरण आणि परिवर्तन या संकल्पनेतून गती पेस या बोधचिन्हातून संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण, तलाव पुनर्विकास, वृक्ष दान, पर्यावरण वारी तसेच विविध कार्यशाळेत मार्फत सामाजिक व शैक्षणिक माध्यमातून इशरे पुणे तर्फे योगदान देण्यात आले.

नंदकिशोर कोतकर म्हणाले की, अध्यक्षपदाच्या कारभाराचा मी सन्मानपूर्वक स्वीकार करत आहे. संस्थेद्वारे आतापर्यंत केलेले चांगले काम यापुढेहि चालू ठेवण्याबरोबर संस्था आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने निश्चितच यापुढे जोमाने काम करत राहील. येत्या वर्षभरात असंख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानविषयक चर्चा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारचे सेमिनार, विविध कार्यशाळा, औद्योगिक भेटी, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

डॉ.अनिल कश्यप म्हणाले की, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतूनच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत असते. भविष्यवेधी शिक्षणाचा विचार करून आपला विद्यार्थी विविध कौशल्यांनी परिपूर्ण केल्यास तो जागतिक पातळीवर नागरिक म्हणून उत्तम  कामगिरी करू शकतो असा विचार करून आम्ही इशरे संस्थेच्या सहाय्याने विद्यार्थांना या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने परिपूर्ण करत आहोत.

Leave A Reply

Translate »