मानसोपचार तज्ञ ,लेखिका व गायिका डॉ. नेहा कामत यांच्या “बाबा तू न जा” या ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांच्यावर चित्रित म्युझिक अल्बमचे 6 एप्रिल 2023 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत म्युझिक लाँच

विविध क्षेत्रातील व्यक्तींचा त्यांच्या लेकीच्या जडणघडणसाठी मान्यवरांच्या उपस्थितीत वडिल-कन्या सन्मान सोहळा

पुणे -वडील आणि मुलीचं हळवं नातं ‘शब्देविण संवादु’ असं असतं. अव्यक्त तरी खूप काही बोलून जाणारं. अशाच नात्यावर आधारित बाबा तू न जा.. या म्युझिक अल्बम चे लॉन्चिंग ६ एप्रिल 2023 रोजी पुण्यातील नवी पेठ येथील श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात सायं. ६ वाजता. होणार आहे. कामत सोशल फाऊंडेशन आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील पाच व्यक्तींचा त्यांच्या लेकीच्या जडण घडणी साठी त्यांच्या लेकींसह सन्मान करण्यात येणार आहे. प्रसिध्द अभिनेते माधव अभ्यंकर व नेहा कामत अभिनित या म्युझिक अल्बम चे लॉन्चिंग अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ. रवी चिटणीस, ज्येष्ठ पत्रकार अभिजीत राणे, रात्रीस खेळ चाले फेम प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, गायिका ,गीतकार , लेखिका मानसोपचार तज्ञ, तसेच कामत सोशल फाउंडेशन व माईंड स्पा क्लिनिकच्या संस्थापिका डॉ.नेहा कामत ,म्युझिक अल्बम चे दिग्दर्शक विशाल दिलीप राजहंस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते लेखिका डॉ. नेहा कामत यांच्या सायकोलॉजी अँड यू या कव्हर पेजचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.हा कार्यक्रम कामत सोशल फाउंडेशन व विध्यांकुर एज्युकेशन यांच्या विशेष सहकार्याने संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी लॉन्चिंग पार्टनर आयडीएफसी बँक व साऊल रूट माईंड स्पा क्लिनिक असणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे.

Leave A Reply

Translate »