जागतिक महिला दिनानिमित्त कोथरूड हॉस्पिटलतर्फे
महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आज

पुणे: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोथरूड हॉस्पिटलमध्ये शहरातील सर्व महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. हे शिबिर ८ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये होणार आहे. अशी माहिती हॉस्पिटलच्या स्त्री रोग तज्ञ डॉ. मंजुषा प्रभुणे व डॉ. राजेद्र मिटकर यांनी दिली आहे.कॅन्सर हा गंभीर आजार असून, लवकर निदान झाल्यास, त्यावर लवकर उपचार सुरू करता येतात. त्यामुळे परिणाम चांगले येतात. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, प्रामुख्याने आढळतो. त्याच प्रमाणे ४० वर्ष वयाच्या पुढे महिलांमधील रक्ताचे प्रमाण, हिमोग्लोबिन आणि थॉयरॉइट्सची तपासणी केली जाईल. आयोजित शिबिरात संभाव्य कॅन्सर रुग्णांची तपासणी करून त्यावर योग्य उपचार करता येतील. भविष्यातील आजार टाळण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.मंजुषा प्रभुणे, डॉ. संजना भारती , डॉ. लीना दोभाडा व डॉ प्राची अमराळे हे महिलांची तपासणी करून मोफत औषधे व मार्गदर्शन करतील.

Leave A Reply

Translate »