‘शंभरावं स्थळ’ला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद

पुणे: मुलं मोठी झाली की आई वडिलांना एकच टेन्शन असतं, की एकदा हिचं किंवा त्याचं लग्न झालं की आपण मोकळे.. म्हणूनच वयात आलेल्या मुलांच्या पाठीमागे आई-वडिलांनी लग्नाचा भुंगा सोडलेला असतो… या भुंग्याच्या तावडीतून सुटण्यासाठी बिचारी मुलं धडपडत असतात आणि शेवटी लग्न करण्यासाठी होकार दिला जातो… मग सुरु होतो… स्थळं पाहण्याचा थरारक खेळ…. यातूनच उलगडत जाते अनुजा आणि चिन्मय या दोघांची गोष्ट म्हणजे, ‘शंभरावं स्थळ’….!!

एक महत्वाकांक्षी, यशस्वी, आत्मविश्वासाने परिपूर्ण असणारी अनुजा प्रत्येक स्थळाला नकार देते आहे, याचं नक्की कारण काय ? एक शांत, समंजस मुलगा चिन्मय एका स्थळाला नकार देतो, मग एक मुलगी थेट त्याच्यात घरी जावून नकाराचं कारण विचारते…!! यात अनुजा, चिन्मय आणि यांच्या कुटुंबात रंगलेली गोष्ट म्हणजे ‘शंभरावं स्थळ’ शॉर्टफिल्म्स स्वरुपात मांडण्यात आली आहे.

या शॉर्टफिल्मचे लेखन आणि दिग्दर्शन बन्सीधर किंकर यांनी केले आहे. या शॉर्टफिल्मची निर्मिती ‘आदि निर्मिती’ आणि एसएनसी लँडमार्क यांच्यावतीने करण्यात आले आहे. एसएनसी लँडमार्कचे गौरव शहा हे निर्माते आहेत.

ही शॉर्टफिल्म नवीन वर्षात १५ जानेवारी रोजी ‘आदी निर्मिती’च्या युट्युब चॅनलवरून प्रसिद्ध करण्यात आली. या फिल्मला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. केवळ दहाच दिवसात साडेतीन लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी पाहिली असल्याने ही फिल्म चांगलीच व्हायरल होत आहे.

कोणतेही ‘पेड प्रमोशन’ न करता केवळ फिल्मचा आशय, मांडणी, कलाकारांचा अभिनय, निर्मिती मुल्ये याच्या जोरावर या शॉर्टफिल्मला ऑनलाईन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सुमारे ३५ देशातील लोकांनी ही फिल्म पाहिली असून फिल्म पहाणारे रसिकच ही फिल्म इतरांनी पहावी यासाठी एकमेकाना ‘रेफरल्स’ देत आहेत, हे निर्माता म्हणून माझ्यासाखी खूप सुखद आणि गोड धक्का असल्याचे निर्माते एसएनसी लँडमार्कच्याचे गौरव शहा यांनी बोलताना सांगितले.

मुळात शॉर्टफिल्मच्या निमित्ताने आपण केलेले काम लोकांना आवडत आहे, हे कोणत्याही लेखकासाठी आणि दिग्दर्शकासाठी महत्वाचे असते. शॉर्टफिल्म पाहिल्यानंतर अनेकांनी आपली प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोचविली आहे, जी आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. चिन्मय आणि दीप्ती या दोघांनी आपली भूमिका वठविताना प्रचंड मेहनत घेतली, असे लेखक व दिग्दर्शक बन्सीधर किंकर यांनी बोलताना सांगितले.

निर्मिती : आदि निर्मिती व एसएनसी लँडमार्क
निर्माते : गौरव शहा (एसएनसी लँडमार्क)
लेखन व दिग्दर्शन : बन्सीधर किंकर
प्रमुख भूमिका : चिन्मय उदगीरकर, दीप्ती देवी
युट्युब : https://www.youtube.com/@aadinirmitee

Leave A Reply

Translate »