‘पालकत्व १०वी च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे’– फक्त पालकांसाठी मोफत सेमिनार, रवीवारी १५ रोजी,
लायन्स क्लब पुणे डिजिटल आणि टाकळकर क्लासेस यांच्या तर्फे आयोजन

पुणे, १० वी च्या बोर्डाच्या परीक्षा काळात फक्त विद्यार्थीच नव्हे तर पालकांबरोबर संपूर्ण कुटुंब देखील तणावात असते.
अशावेळेस जागरूक आणि सजग पालकत्वाच्या भूमिकेला अनन्य साधारण महत्व आहे. याच विषयाला अनुसरून लायन्स क्लब पुणे डिजिटल आणि टाकळकर क्लासेस यांच्या तर्फे ‘पालकत्व १०वी च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे’ या विषयावर पुण्यातील १०वी च्या फक्त पालकांसाठी मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. १५ जानेवारी रोेजी सायं. ६ ते ८ या वेळेत टिळक स्मारक मंदिर, टीळक रोड, पुणे येथे होणार आहे.
पुरस्कार प्राप्त करियर मार्गदर्शक आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्रा. केदार टाकळकर हे पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. परीक्षेच्या तणावपूर्ण काळात पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी, काय करावे काय करू नये याचे नेमके, सखोल, अभ्यासपूर्ण आणि व्यापक मार्गदर्शन पालकांना या निमित्ताने मिळणार आहे. पाल्यांच्या जडघडणीत आणि सर्वांगीण विकासामध्ये पालकत्वाची भूमिका अत्यंत महत्वाची असतेच पण परीक्षेच्या काळात ही जबाबदारी जास्त काळजीपूर्वक निभावावी लागते या संदर्भातील प्रत्येक मुद्याचे सहज आकलन पालकांना होवून विद्यार्थ्यांनी तणाव विरहीत राहून परीक्षेत घवघवीत यश मिळवावे हा मुख्य उद्देश ठेऊन सादर सेमिनार आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेली ३७ वर्षापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी टाळकर क्लासेस सदैव उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे सेमिनार आयोजित केले आहे. त्याचा जास्तित जास्त पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन टाकळकर क्लासेस चे संचालक शीतल पाटील यांनी केले आहे. अधिक माहिती टाकळकर क्लासेसच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

००००००

Leave A Reply

Translate »