‘क्रोनिकल अँड सागाज’ या इंग्रजी कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे:आदित्य राजकुमार गुप्ता या लेक्सिकॉन शाळेच्या विद्यार्थ्यांचे क्रोनिकल अँड सागाज या इंग्रजी कवितांच्या पुस्तकाचे नुकतेच ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. लहानपणापासून वाचनाची व लिखाणाची आवड असलेल्या आदित्यचे अनेक लेख आणि कविता अनेक नामांकित वर्तमान पात्रातून छापून आल्या आहेत. आठव्या वर्गात शिकत असलेल्या आदित्यच्या या कविता त्याच्या वयाच्या मानाने अतिशय प्रगल्भ आहेत.या कविता आणि कथा त्यांच्या अतुलनीय कल्पनाशक्तीचे चित्रण करतात आणि वाचकाला उत्कंठापूर्ण प्रवासात घेऊन जाण्याची क्षमता या लिखाणामध्ये आहे. पुस्तक लोकांना प्रेरणा देते आणि सुसंवाद आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या मूलभूत मूल्यांवर जोर देते. या वेगवान जगात जिथे दिवसेंदिवस गोष्टी विकसित आणि बदलत आहेत, जिथे लोक तंत्रज्ञानाचे गुलाम बनत आहेत आणि दैनंदिन सुखापासून दूर जात आहेत, तिथे हे पुस्तक जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींद्वारे लोकांना आनंद देण्याचे काम करतात.’क्रोनिकल अँड सागाज’ हे पुस्तक ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नोशन प्रेस या संकेस्थळावर उपलब्ध असून त्याची किंमत १९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

Leave A Reply

Translate »