विभागीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये पुण्याची उत्कृष्ट कामगिरी

पुण्याच्या सिद्धी जगदाळेला जिल्हास्पर्धेत सुवर्ण तर विभागात रौप्यपदक

पुणे – नुकत्याच अहमदनगर येथे झालेल्या दक्षिण विभागीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये पुण्यातील लोहगावमधील विखे पाटील मेमोरियल स्कूलच्या प्राची चॅटर्जी हिला सुवर्णपदक मिळाले तर पोतदार इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थिनी सिद्धी जगदाळे हिला रौप्य पदक मिळाले असून त्याआधी दौण्ड येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सिद्धीला धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले होते. १७ वर्ष वयोगटातील दोघी विजेत्या आहेत.

देशभरातून या स्पर्धेसाठी सीबीएसई शाळांमधील ३०० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात केरळ, नागपूर, पुणे, नाशिक, सातारा, गोवा, अहमदनगर, दिल्ली, जळगाव येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. १४, १७ आणि १९ वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या.

प्रशिक्षक रणजित चांबले यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धीचा धनुर्विद्येचा सराव सुरु आहे. सिद्धीने धनुर्विद्येमध्ये मिळविलेले प्रावीण्य वाखाण्याजोगे आहे. यापुढे तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे आहे. खेळावर सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करून दिवसागणिक सराव वाढविण्यावर तिचा भर असल्याचे ती सांगते.

Leave A Reply

Translate »