हिमानी अग्रवाल आणि गायत्री ठाकूर बनल्या मिसेस आणि मिस हेरीटेज इंडीया

सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठीचा अनोखा फॅशन शो

पुणे, – किल्ले प्रतापगड, पद्मनाभ मंदीर, सुवर्ण मंदीर, केदारनाथ मंदीर, तुळजापूर देवी मंदीर, ऐरावतेश्वर मंदिर तसेच देशातील इतर ऐतिहासिक पर्यटन स्थळांबद्दलचा सांस्कृतिक वारसा लोकांना माहिती व्हावा यासाठी मिस आणि मिसेस हेरिटेज इंडिया या अनोख्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. पुण्यात नुकत्याच झालेल्या या फॅशन शो मध्ये मिसेस हेरीटेज इंडीया हिमानी अग्रवाल, मिस हेरिटेज गायत्री ठाकूर, क्लासिक हेरिटेज डॉ. सपना साहू विजेत्या झाल्या.

भारताचा सांस्कृतिक वारसा जोपासण्याबरोबरच बोली परंपरा, सादरीकरणाची कला, सामाजिक रिवाज, विधी, सणसमारंभ, निसर्गाशी संबंधित ज्ञान आणि पारंपरिक कारागिरीबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले. आपल्या ऐतिहासिक वास्तू, प्राचीन परंपरा या आपल्या व्यक्तिमत्वाचा, जीवनशैलीचा भाग कसे असतात ते या फॅशन शो मधून पहायला मिळाले.

यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. देशभरातून अनेक महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ‘संकल्प’ असून आयोजन मृणाल एंटरटेनमेंट यांनी केले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सिनेदिग्दर्शक अभिजीत पानसे, संकल्पचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. पी.एन. कदम हे प्रमुख पाहुणे होते. मृणाल एंटरटेनमेंटच्या संचालिका मृणाल गायकवाड, प्रशांत जोशी, सचिन नारकर, सुधीर निंबाळकर, संदीप मोहितेपाटील, सुनिता मोडक, संजीव कुमार, अमितराजे गायकवाड, जयेश खाडे, अजित कुलकर्णी, वैशाली भगोडीया, कविता शाह अवस्थी, शोभा वाधवाणी, योगेश सुर्यवंशी उपस्थित होते. मेकअप विवा मेकअप स्टुडीओ, एम्स स्पोर्ट अ‍ॅंड फिटनेस, फोटोग्राफी योगेश सुर्यवंशी, डिजायनर कविता शहा अवस्थी, शोभा वाधवाणी याशिवाय मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांची उपस्थिती होती. चंदुकाका सराफ, जिजा स्टुडीओ, जेएमएम मसाले, योगेश सुर्यवंशी, राधेय टुर्स अ‍ॅंड ट्रॅव्हल, खामिस्रि व्ही24, यश अ‍ॅग्रो यांनी स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले.

Leave A Reply

Translate »