न्यायालयीन कोठडीचा आदेश झाल्यादिवशीच आरोपीस जामीन मंजूर

पिंपरी: पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत घरगुती कारणावरून झालेल्या भांडणातून लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने डोक्यात व हातावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याबद्दल तक्रार दाखल केलेली होती. फिर्यादी सत्यभामा साळवे यांनी आरोपी रोहित धस व ऋतिक धस यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी आरोपी रोहित धस याला दिनांक २३ जुलै रोजी अटक केली होती. न्यायालयाने २६ तारखेपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावलेली होती त्यावर दि. २६ जुलै रोजी सदर आरोपीस न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र न्यायालयीन कोठडीचा आदेश झाल्यादिवशीच सदर प्रकरणामध्ये आरोपीला जामीन मिळाला आहे. आरोपीचे वकील हृषीकेश धुमाळ यांनी आजच आरोपीतर्फे जामीन अर्ज दाखल केला होता.

सदर जामीन अर्जावर पोलिसांनी त्यांचे म्हणणे दाखल करून सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपीचा जामीन नामंजूर करण्यात यावा असे म्हणणे दाखल केले होते. सरकारी वकील यांनीदेखील आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून अजामिनपात्र आहे तसेच सदर गुन्ह्यात आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद असून आरोपीला जामीन दिल्यास तो पुन्हा गुन्हा करून फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्यामुळे आरोपीचा जामीन नामंजूर करण्यात यावा असे म्हणणे दाखल केले. त्यावर आरोपीचे वकील हृषीकेश धुमाळ यांनी युक्तिवाद केला व सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला. आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीचा आदेश झाल्यादिवशीच सदर प्रकरणामध्ये आरोपीला जामिनावर सोडण्यात आलेले आहे त्यामुळे आरोपीची कारागृहात जाण्यापासून सुटका झालेली आहे.

==========================================

Thanks & Regards

Adv Hrishikesh Dhumal

Mobile No. 9860239519

Leave A Reply

Translate »