ज्ञानज्योति सामाजिक संस्था द्वारा सुषमा चोरडिया को ‘आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव पुरस्कार’ प्रदान

पुणे : ज्ञानज्योती सामाजिक सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीने पणजी (गोवा) येथे झालेल्या कार्यक्रमात पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना ‘आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी समाजभूषण, समाजरत्न, समाज गौरव, कलाभूषण, कलारत्न, कलागौरव, क्रीडा भूषण या पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. महाराष्ट्र,
कर्नाटक, गोवा भागातील प्रतिभावंतांना गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ फेटा, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पदक असे पुरस्काराचे स्वरूप होते. त्यांना हा पुरस्कार राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवार्ड २०२१ अंतर्गत देण्यात आला. यावेळी ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, संयोजक डॉ. विक्रम शिंगाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सुषमा चोरडिया आपल्या मनोगतात म्हणाल्या, “सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना १९९९ मध्ये झाली. प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या कल्पक नेतृत्वात सूर्यदत्ताने ‘केजी टू पीजी’पर्यंत भरारी घेत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझाईन, इंटिरियर डिझाईन, व्होकेशनल कोर्सेस, तसेच एमबीए, बीबीए, एमसीए, पीजीडीएम यासारखे विविध अभ्यासक्रम आमच्याकडे शिकवले जातात.


नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे संस्थेची शाळा, तसेच महाविद्यालये सतत चर्चेत असतात. दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट शिक्षक वर्ग, आपलेपणाने वागणारे कर्मचारी आणि सातत्याने वर्ल्ड रेकॉर्ड करणारी सूर्यदत्ता संस्था ही आमची ओळख आहे. या संपूर्ण कार्यात मीही स्वतःला झोकून देऊन काम करते. आपल्यासारख्या संस्थांकडून होत असलेल्या कौतुकामुळे आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते.”


प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “देशाच्या विकासात योगदान देऊ शकणारी कौशल्याभिमुख आणि रोजगारक्षम पिढी घडत आहे. ‘सूर्यदत्ता’ने परंपरा आणि आधुनिकता याची सांगड घालत विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण दिले आहे. त्यासाठी सातत्याने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कार्यशाळा, प्रशिक्षण व प्रात्यक्षिक अनुभव देणारे उपक्रम राबविले जातात. ज्ञानज्योती सामाजिक सेवाभावी संस्थेचा मानस अत्यंत चांगला आहे. समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा शोध घेवून त्यांचे कौतुक करणे, हे अत्यंत
अवघड काम आहे. ‘सूर्यदत्ता’च्या वर्ताने दरवर्षी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये भीमसेन जोशी, अनुपम खेर यांच्यापासून ते विविध राज्याचे राज्यपाल यांचा समावेश होतो. त्यामुळे आम्हाला या कामाची कल्पना आहे. सूर्यदत्ताचा प्रचार आणि प्रसार आणि त्यासाठी दर्जेदार कामगिरी हे आमचे उद्दिष्ट आहे. आपण जो पुरस्कार दिला आहे. त्याचा विनम्रतापूर्वक स्वीकार करतो.”


डॉ. सुमित्रा भोसले म्हणाल्या, “घर सांभाळत शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य सुषमा चोरडिया करत आहेत. त्यांच्या रूपाने स्त्रीशक्तीचे खरे दर्शन घडले. एक स्त्री केवळ घर सांभाळत नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाला संस्कारित करत असते. त्याचे बोलके उदाहरण म्हणजे सुषमा चोरडिया आहेत. त्यांचे मनापासून अभिनंदन करते.” कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक डॉ. विक्रम शिंगाडे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. आभार धोंडिबा कुंभार यांनी मानले.

Leave A Reply

Translate »