Sarsenapati Hambirrao Official Teaser, Pravin Tarade, Gashmir Mahajani, Sandeep Mohite Patil

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या बहूप्रतिक्षित ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

सरसेनापती हंबीरराव’ यांच्या भूमिकेत दिसणार प्रविण विठ्ठल तरडे

– भव्य ऐतिहासिक चित्रपट लवकरच 2022 मध्ये होणार प्रदर्शित

कोरोनाच्या दोन लाटांनंतर मराठी चित्रपटसृष्टी आता पूर्वपदावर येत आहे. मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर सुरू झाले आहेत. मराठी प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पहात असलेल्या आणि प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्याची क्षमता असलेल्या लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’या बहूप्रतिक्षित चित्रपटाचा रक्त उसळवणारा टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश संपादन केले. यामुळे त्यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता होती, तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आज सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ च्या टीझरने चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढली आहे. या टीझर मधून चित्रपटाची भव्यता तर लक्षात येतेच पण चित्रपटातील संवाद आणि ऍक्शन सिक्वेन्स जबरदस्त लक्षवेधी असणार आहेत याचाही अंदाज येतो.

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसले. मराठीतील हँडसम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे उघड झाले होते. तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार? या प्रश्नाचे उत्तर टिझर मध्ये मिळाले असून मुख्य भूमिकेत दमदार अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे दिसणार आहेत.

संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येणार आहे. 

टिझर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

Leave A Reply

Translate »