अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कलारंभ 2’ या अनोख्या अभिनय प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा

अभिनय क्षेत्रात करियर करण्याची अनेकांची इच्छा असते असते मात्र अनेकदा योग्य मार्गदर्शन मिळत नाही. किंवा अनेकांना त्यांच्यात टॅलेंट असतानाही मोठ्या संस्थामध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेता येत नाही.  आता अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करणाऱ्या मुला- मुलींना योग्य मार्गदर्शनाबरोबरच शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवण्याची संधी ‘कलारंभ 2’ अभिनय प्रशिक्षण उपक्रमांतर्गत मिळणार असल्याची माहिती स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमी च्या संचालिका पूजा जालंदर आणि संचालक अभिषेक भारद्वाज यांनी ‘कलारंभ 2’  ची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेते माधव अभ्यंकर, स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीचे अमित गैधर, संजय कुमार झा, संजय ससाणे DYPT RTO, प्रीती मालपुरे, पल्लवी कौशिक, महेश शिळीमकर, प्रोड्युसर अमोल मांगज यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पूजा जालंदर म्हणाल्या, ‘कलारंभ 2’ उपक्रमांतर्गत आम्ही नवोदित कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण आणि करियर मार्गदर्शन करणार आहोत, तसेच 50 विद्यार्थ्यांची बॅच असेल त्यापैकी 25 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात अभिनेते स्वप्नील जोशी, माधव अभ्यंकर यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील आणि एफटीआयआय मधील  दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत, हा प्रशिक्षण कालावधी तीन महिन्यांचा असणार आहे. तसेच या प्रशिक्षणासाठी आम्ही ऑडिशन घेणार आहोत त्यातून 25 गरजू विद्यार्थ्यांना अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या वतीने स्कॉलरशिप दिली जाणार आहे. तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमच्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये या कलाकारांना अभिनयाची संधी सुद्धा आम्ही देणार आहोत असे पूजा जालंदर यांनी सांगितले. 

‘कलारंभ 2 ‘ उपक्रमांबद्दल बोलताना पूजा जालंदर म्हणाल्या की, यंदा कलारंभ या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे आम्ही पहिल्या वर्षी हे प्रशिक्षण ऑनलाईन केले होते. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, विजय पटवर्धन, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, संदीप पाठक यांच्यासह 10 मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. यावर्षी प्रत्यक्ष क्लासेस होणार आहेत. यासाठीची नावनोंदणी सुरू झाली असून क्लासेस दिवाळीनंतर सुरू होतील.  मागील वर्षीच्या ‘कलारंभ’ उपक्रमातून जमा झालेला निधी आम्ही पडद्यामागील कलाकारांच्या मदतीसाठी वापरला होता असेही  पूजा जालंदर यांनी सांगितले.

Leave A Reply

Translate »