रंगारंग रनवे-२०२४ मध्ये विविध फॅशनेबल कपड्यांची प्रस्तुती

पुणे – फॅशन, ब्यूटी ग्लॅमर अशी टॅगलाईन घेऊन पुण्यात रंगारंग पद्धतीने पार पडलेल्या रनवे-२०२४ मध्ये विविध फॅशनेबल कपड्यांची शानदार प्रस्तुती देण्यात आली. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या फॅशन शोचे आयोजन पल्लवी गोयंका, सोनल जव्हेरी आणि प्रणव जाधव यांच्या वतीने करण्यात आले.
विमान नगर परिसरातील नोव्होटेलमध्ये पार पडलेल्या या फॅशन सोहळ्यात राजा डिजायनर स्टुडिओच्या प्रमुख डिझायनर रुची शाह, सीरीच्या डिझायनर सपना अग्रवाल, तसेच राॅयल तष्ट चे संचालक दीपक माने यांच्यासह एकूण पाच डिझायनरद्वारे द्वारे तयार करण्यात आलेल्या फॅशनेबल कपड्यांचे विविध माॅडेल्सनी आकर्षक प्रदर्शन केले. या सोहळ्याला पुण्याच्या फॅशन विश्वातील तज्ञांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या फॅशन शोमध्ये अत्यंत आकर्षक रंग आणि डिझाईन्सच्या कपड्यांची प्रस्तुती देण्यात आली. यामध्ये आधुनिक काळातील कपड्यांसह पारंपरिक भारतीय कपड्यांचा समावेश होता. यामध्ये शेरवानी, सूट, डिझाईनर साड्या यांचा समावेश होता. हे मनमोहक कपडे कुणाही व्यक्तीची सुंदरता आणखी खुलवतील, अशाप्रकारे तयार करण्यात आले होते. या कपड्यांमध्ये रंग आणि डिझाईन्सचा सुंदर मिलाफ डिझानयरनी साधला होता. डिझायनरच्या मेहनतीचे व कौशल्याचे प्रदर्शन या कपड्यांच्या आकर्षकतेवरून होत होते.

  • डिझायनर्स व माॅडेल्ससाठी एक नवा मंच : आयोजक
    या सोहळ्याच्या आयोजनाविषयी बोलताना आयोजक पल्लवी गोयंका, सोनल जव्हेरी आणि प्रणव जाधव यांनी सांगितले की, पुण्यातील फॅशन डिझायनर द्वारे तयार करण्यात आलेल्या मनमोहक कपड्यांची प्रस्तुती देण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. फॅशन डिझायनर्ससोबतच माॅडेलिंग क्षेत्रातील नवोदित युवक-युवतींनाही एक चांगला मंच मिळावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी आम्ही गेली महिनाभर मेहनत घेत होतो. या सोहळ्यासाठी बरीच पूर्वतयारी आम्हाला करावी लागली. परंतु या मेहनतीमुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आम्ही पूर्णपणे यशस्वी करू शकलो, याचा आम्हाला आनंद आहे.

Leave A Reply

Translate »