महाविद्यालयांना दर्जा समजणार आता सॉफ्टवेअरच्या एका क्लिकवर

शुभम पुरंदरे यांनी साकारले सॉफ्टवेअर ; तब्बल ५० ते ६० महाविद्यालयांनी केला वापर

पुणे : भारतामध्ये आज ७० टक्के महाविद्यालयांकडे चांगला दर्जा असल्याची शासनाची मान्यता नाही. त्याचे एकमेव कारण की ही प्रक्रिया अतिशय अवघड व वेळ खर्च करणारी आहे, असे महाविद्यालयांना वाटते. त्याकरिता पुण्यातील शुभम पुरंदरे या युवकाने स्टुडियम टेक नावाचे सॉफ्टवेअर साकारले असून महाविद्यालयांमधील उपलब्ध सोयी-सुविधा व माहितीवरुन त्या महाविद्यालयाला कोणता दर्जा मिळू शकेल, हे एका क्लिकवर समजणार आहे.

याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत शुभम पुरंदरे यांनी माहिती दिली.

आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी लाखोंचे शुल्क भरत असतो, पण एवढे शुल्क भरून, नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन सुद्धा चांगल्या दजार्चे शिक्षण मिळेल, याची खात्री कोण देणार? हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सरकार नॅक आणि एनबीए नावाने दर्जा प्रदान करण्याची प्रक्रिया राबवित आहे. त्यातून सामान्यांना समजते की नक्की कोणते महाविद्यालय चांगल्या दजार्चे शिक्षण देऊ शकेल.

परंतु नॅकसारखा दर्जा मिळविण्याची प्रक्रिया अवघड असल्याचा समज महाविद्यालयांमध्ये असल्याने शुभम पुरंदरे यांनी स्टुडियम टेक कंपनीच्या माध्यमातून हे नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर साकारले आहे. त्यामध्ये महाविद्यालयांना त्यांच्याकडील उपलब्ध माहिती वापरून काहीच वेळात कोणती ग्रेड किंवा दर्जा शासनाकडून मिळेल, याची माहिती मिळते. सध्या जवळपास ५०-६० महाविद्यालये हे सॉफ्टवेअर वापरत असून त्यांना महाविद्यालयाची संपूर्ण व्यवस्था बसविण्यात आणि चांगली ग्रेड मिळण्यास मदत झालेली आहे.

शुभम पुरंदरे यांच्या कंपनीला देशात टॉप ५० इनोव्हेटिव्ह स्टार्टअप मध्ये नामांकन मिळाले असून त्यांना काही नामांकित गुंतवणूकदारांकडून सहकार्य देखील मिळालेले आहे. आपल्या देशामध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारची मदत आणि योगदान करावे, हा या सॉफ्टवेअरसारख्या उपक्रमांचा उद्देश आहे. आपण आज महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी जे शुल्क भरतो, त्यावेळी आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळेल, याची खात्री हवी, याकरिता हे सॉफ्टवेअर महाविद्यालयांना सहकार्य करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Translate »