देशाच्या विकासाच्या वेगाला सामर्थ्य देणारा अर्थसंकल्प – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे: डोळ्यांसमोर उद्दींष्ट निश्चित असेल तर कोणत्या दिशेने जायचे आहे आणि कसे जायला हवे हे समजणे आवश्यक असते. विकसित भारताचे उद्दीष्ट ठेवल्यानंतर त्या दिशेने दमदार वाटचाल करण्यासाठीचा अर्थसंकल्प, असे आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे वर्णन करता येईल. रोजगाराला चालना, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर बळ, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भक्कम निधीची उपलब्धता, मध्यमवर्गाला आणखी दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे.

रोजगार निर्मितासाठी पुढील ५ वर्षांसाठी २ लाख कोटी रूपयांची तरतूद केली गेली आहे. २० लाख युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाईल. देशातील ५०० प्रमुख कंपन्यांमध्ये १ कोटी युवकांना कार्यानुभव घेता येईल. या युवकांना दरमहा ५ हजार रूपये भत्ता दिला जाईल. हे निर्णय देशातील तरूणांसाठी आश्वासक आहेत. गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीने अर्थसंकल्पात अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. दोन कोटी घरे पुढील पाच वर्षात निर्माण केली जातील. चाळीस हजार रेल्वे बोगींचे वंदे भारतमध्ये रूपांतर केले जाईल. हे सारेच निर्णय विकासाच्या वेगाला सामर्थ्य देणारे आहेत.

Leave A Reply

Translate »