उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त १०५४ रिक्षा चालकांना गणवेश कापड वाटप

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त आज कसबा विधानसभा मतदारसंघात रिक्षा चालकांना गणवेशाचे कापड वाटप करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विशेष सहकार्याने व कसबा भाजपा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील रिक्षाचालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. जेष्ठ रिक्षा चालक बापू भावे व बघतोय रिक्षावाला संघटनेचे डॉ केशव क्षीरसागर यांच्या हस्ते १०५४ रिक्षा चालक काकांना गणवेशाचे कापड वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “वक्तृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा त्यांचा कायम आग्रह असतो. त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ऊन, वारा, पावसात पुणेकरांना सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांसाठी गणवेश कापड वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नुकतेच सरकारने वाहन योग्यता प्रमाणपत्रासाठी दर दिवशी आकारण्यात येणारे 50 रुपयांचे विलंब शुल्क रद्द केले, याबद्दल सर्व रिक्षा चालकांच्या वतीने मी महायुती सरकारचे आभार मानतो. येत्या काळामध्ये देखील रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करत राहू”

यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, मा. नगरसेवक आरतीताई कोंढरे, राजेश येनपुरे, धनंजय जाधव, योगेश समेळ, सम्राट थोरात, सरचिटणीस उमेश चव्हाण, अमित कंक, चंद्रकांत पोटे, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, निर्मल हरिहर, प्रशांत सुर्वे, राणीताई कांबळे, वैशाली नाईक, रिक्षा आघाडी अध्यक्ष राजाभाऊ साळवी, कार्यक्रमाचे संयोजक सोहन भोसले, किरण जगदाळे, छोटू वडके, सागर शिंदे यांच्यासह कसबा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Translate »