एन. जी .फिल्मस प्रोडक्शन आयोजित गॉर्जियस फेस ऑफ पुणे 2024ग्रँड फॅशन शो चा जलवा पुण्यात उत्साहात संपन्न

किड्स ग्रुप मध्ये त्रिशा जाधव व मनवा शेळके, मिस मधे क्षितिजा फुले तर मिसेसमध्ये हर्षदा देशमुख प्रथम पारितोषिक विजेत्या

पुणे-एन. जी .फिल्मस प्रोडक्शनतर्फे तसेच मुख्य आयोजक नितेश गायकवाड , शो डिरेक्टर स्वाती भोई यांच्यातर्फे आयोजित गॉर्जियस फेस ऑफ पुणे ग्रँड फॅशन शो 2024 भोसरी येथील संत तुकाराम बँक्वेट मधे नुकताच उत्साहात संपन्न झाला. श्री गणेशाच्या प्रतिमेची पुजन करून उपस्थित मान्यवर तृप्ती देसाई ,हर्षल गोंड पाटील, कृष्णा बालवाडकर, सतीश फुगे, किरन कोरे, प्रकाश धिंडले, किरन जट, गजानन पाडोळ, अनुराग कांबळे, मेहंदी मुल्ला, विशाल मिसाळ, शितल ढेकले, प्रमोद साखरे, सोनाली काकडे, ज्योती सोनके, शरद नवगिरे, रोहीणी मानकर, अश्विनी तेंडुलकर, सोनाली कोठारे ,अतुल गुंजाळ, संदिपा मॅडम,रमेश साठे,हे मान्यवर उपस्थित होते.त्यानंतर लगेचच व्ही.एस .डान्स कंपनी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून गणेश वंदना सादर करून एक प्रसन्न वातावरण तयार केले.त्यानंतर किड्स , मिस ,मिसेस स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. इंटरनेशनल लावणी सम्राट किरण कोरे यानी आपल्या नृत्याची बिजली ने शिट्टी आणि टाळ्याच्या गजरात वातावरण प्रसन्न करून टाकले.
मिस मिसेस व लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पूणे जिल्ह्याबरोबर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक से बढकर एक बुद्धी व सौंदर्याची खाण घेऊन स्पर्धकांनी या कार्यक्रमास आपली हजेरी लावली होती.प्रसिद्ध निवेदक महेश सोनी बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या स्पर्धेत किड्स ग्रुप 3 वर्ष to 7 वर्ष विजेती त्रिशा जाधव , फर्स्ट रनर अप हिंदवी नांदखीले , सेकंड रनर अप आरूष चिखले
किड्स ग्रुप 8वर्ष to 13वर्ष, विजेती मनवा शेळके , फर्स्ट रनर अप आर्या थोरात , सेकंड रनर अप दर्शना पावडे, मिस मधे
मिस प्रथम विजेती क्षितिजा फुले ,फर्स्ट रनर अप भाग्यश्री बावसर , सेकंड रनर अप दिव्या गायकवाड , मिसेस मधे
मिसेस प्रथम विजेती हर्षदा देशमुख ,फर्स्ट रनर अप माधुरी पाटील, ,सेकंड रनर अप प्रज्ञा शेळके आदी विजेते ठरले.सर्व स्पर्धकांना क्राउन ,सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच सर्वच सहभागी स्पर्धकांना सन्मानीत करण्यात आले. तसेच विजेत्या स्पर्धकासाठी सोनाली काकडे यांच्या कडून गिफ्ट व्हाउचर व कुसुमवत्सल फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांच्या कडून पैठणी साडी गिफ्ट म्हणून देण्यात आले.कार्यक्रमाला परीक्षक म्हणून अतुल गुंजाळ, फॅशन मॉडेल संदीपा जना, सिद्धी गोहिल,यांनी काम पाहिले.तसेच ग्रूमर म्हणून विशाखा अडसूळ, शो टॉपर अश्विनी तेंडुलकर , किड्स शो टॉपर शर्वरी कांबळे यांनी काम पाहिले. मेकअप पार्टनर आयशा शेख आणि त्यांच्या टीम ने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत ईगले , कार्तिक जाधव, अभिजित खुर्दे, सुश्मिता शर्मा, भूमी सेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच या कार्यक्रमासाठी एन. जी. फिल्मस प्रस्तुत गॉर्जियस फेस ऑफ पुणे 2024चे आयोजक नितेश गायकवाड , स्वाती भोई यांनी विशेष परिश्रम घेतल्यामुळे हा भव्य दिव्य असा सोहळा मोठया थाटात पार पडला. या कार्यक्रमासाठी मीडिया पार्टनर म्हणून ,स्वराज्य रक्षक न्यूज सोमनाथ नढे ,झुंज न्युज चे प्रसाद वडगुले, महाराष्ट्राची भूमीचे प्रशांत निकम, द लीडर न्युज चे विवेककुमार तायडे, रिपोर्टर टुडे न्यूज चे रामदास तांबे,फोटोग्राफर लाकेश वागदरे ,विडिओ आनंद पाटवा , साठे स्टूडिओ, व्हि एस डान्स कंपनी चे शुभम वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave A Reply

Translate »