महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे पुण्यात आषाढी एकादशी निमित्त वारीच्या निमित्ताने 2 जुलै 2024 रोजी पुण्यातील गोळीबार मैदान ते हडपसर या या मार्गदरम्यान मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत कौशल्य विकास दिंडीचे आयोजन

पुणे -महाराष्ट्राला संत वारकरी सांप्रदायाची व संतांची थोर परंपरा लाभलेली असून, समाजसुधारणा आणि समाज विकासाची अविरत गंगा या परंपरेतून अव्याहतपणे वाहते. देशाच्या जडणघडणीत विकासामध्ये महाराष्ट्राचे महत्वपुर्ण योगदान असून दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून पंढरपुरकडे विविध संतांच्या दिंडया जातात. ही परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीच्या माध्यमातून अग्रस्थानी असते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कुशल भारत या संकल्पनेतून जगाचे नेतृत्व करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे. या संकल्पनेतूनच राज्याचे.मंत्री महोदय मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विकास या संकल्पनेव्दारे विविध उपक्रमांना राज्यामध्ये चालना दिलेली आहे. त्याच संकल्पनेतून राज्याच्या संत परंपरेच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या निमित्ताने घडत असणा-या दिंडीमध्ये कौशल्य विकास दिंडीचे आयोजन करण्याचा संकल्प कौशल्य विकास व
उदयोजकता व नाविन्यता या विभागास दिलेला आहे.

मंत्रीमहोदयांच्या या संकल्पाचे यशस्वीरित्या आयोजन करण्याबाबत आयुक्त, निधी चौधरी आणि संचालक, डी.ए.दळवी या दोन्ही प्रमुखांच्या नेतृत्व आणि
मार्गदर्शनाखाली राज्यभरातील कौशल्य विकास विभागातील कौशल्याबाबतचे ज्ञान जनतेला अवगत करण्याचे अनुषंगाने, दिनांक 2 जुलै 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता पुणे ते हडपसर या दरम्यान
गोळीबार मैदानापासून गाडीतळ हडपसर येथपर्यन्त कौशल्य विकास दिंडीचे शासन स्तरावरुन
आयोजन करण्यात आलेले आहे. सदर दिंडीस मंत्रीमहोदय तसेच मंत्रालयातील आणि
संचालनालयातील वरिष्ठ अधिकारी वर्ग येणार आहेत.

त्यानुसार पुणे शहरातील व जिल्हयातील नजिकच्या शासकीय / अशासकीय औदयोगिक
प्रशिक्षण संस्था, पुर्वव्यावसायिक संस्था, किमान कौशल्य आधारीत संस्था, व्दिलक्षी अभ्यासक्रम
संस्था, प्रमाणपत्र अभ्यासक्रम संस्था आणि कौशल्य विकास विदयापीठ तसेच रोजगार स्वयंरोजगार
विभाग, आदी मार्फत विदयार्थी, स्वयंसेवी संस्था, स्टार्टअप उपक्रमाचे लाभार्थी, ग्रामीण कौशल्य विकास
केंद्रातील, अधिकारी, कर्मचारी आणि विदयार्थी सहभागी होणार आहेत. अशा प्रकारे निघणा-या
दिंडीचे अत्यंत सुनियोजनबध्द आयोजन करण्यात आलेले आहे.

त्या अनुषंगाने माहिती रथ व्यवस्था, ध्वनीयंत्रणा, डीजीटल डीस्प्ले, सदर कौशल्य दिंडीकरीता यु टयुब, इन्स्टाग्राम, फेसबुक यावर माहिती देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दिंडीत सर्व शिक्षक व कर्मचारी आपआपल्या संस्थेचे माहिती बॅनर्स, फलेक्स सोबत घेऊन येणार आहे. सदर दिंडी मंत्री मंगल प्रसाद लोढा यांच्या उपस्थितीत होणार असल्यामुळे अत्यंत महत्वाच्या व्यक्ति सदर दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये कौशल्य विभाग. मंत्रालय, मुंबई, आयुक्त, संचालक आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. सदर पत्रकार परिषदे करिता माहिती देण्यासाठी मंगलप्रभात लोढा यांचे विशेष कार्य अधिकारी निखिल नानगुडे , व्यवसाय शिक्षण प्रादेशिक कार्यालया पुणे चे उपसंचालक चंद्रशेखर ढेकणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी पुणे उदयशंकर सूर्यवंशी, रोजगार स्वयंरोजगार विभागाची माननीय सहाय्यक आयुक्त श्सुरज महाजन तसेच प्रा.रवींद्र शाळू आदी मान्यवरांनी पत्रकार परिषदेस माहिती दिली .

Leave A Reply

Translate »