कला महर्षी बाबुराव पेंटर हा जीवनगौरव पुरस्कार मिळाला याचा मला खूप आनंद- मोहन जोशी

सत्यारंभ सीने नाट्य संस्था व डीलक्स स्टुडिओज तर्फे कलामहर्षी चित्रसूर्य बाबुराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना तर कला गौरव पुरस्कार सुरेखाताई पुणेकर यांना प्रदान

पुणे – सत्यारंभ सीने नाट्य संस्था व डीलक्स स्टुडिओज आयोजित कलामहर्षी चित्रसूर्य कै बाबुराव पेंटर जन्मोत्सव पुरस्कार सोहळा अण्णाभाऊ साठे सभागृह येथे संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार तर लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांना कलारत्न पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष जगताप कार्यक्रमाचे आयोजक रमाकांत सुतार दीपक गायकवाड मुख्य संयोजक आणि निवेदक अमोल कुंभार व कृष्णा खबाले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात साहित्य सामाजिक कला औद्योगिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पडद्यामागील कलाकारांचा सन्मान करणारा हा सोहळा इथून पुढे वर्षं वर्ष चालत राहावा असे वक्तव्य सुरेखाताई पुणेकर यांनी केले तर मोहन जोशी यांनी सुरेखाताई पुणेकर यांच्या सोबतच्या काही आठवणींना उजाळा देत आयोजकांना शुभेच्छा दिल्या
चित्रपट निर्मिती व्यवस्थापक कुणाल निंबाळकर व चित्रीकरण क्षेत्रातून मंगेश गाडेकर यांना कलागौरव तर आर जे सुमित यांना कलारत्न तसेच कृष्णकांत चेके यांना साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी फॅशन डिझायनार सिद्धी गोयल, पोलीस दामिनी पथकच्या सोनाली हिंगे,अभिनेत्री मीरा जोशी, मॉडेल दिपककुमार, मॉडेल श्रद्धा काळे यांचा ही पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला

Leave A Reply

Translate »