हवामान बदलासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा”-पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी .पी.

ग्रीन हिल्स ग्रुप संस्थेतर्फे टेकडी संवर्धन ,जनजागृती, पर्यावरण रक्षणाचे उपाय या विषयावर चर्चासत्र व प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न                

पुण्यातील पर्यावरण प्रेमी साठी 8 जून ते 10 जून 2024 दरम्यान पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे पर्यावरणावर आधारित पेंटिंगचे प्रदर्शन

पुणे -पर्यावरण दिनानिमित्त ग्रीन हिल्स संस्थेतर्फे पुण्यातील   बालगंधर्व रंगमंदीर  आर्ट गॅलरी येथे ‘पुण्यातील प्रदूषणावरील उपाय वरील “प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी.  व पुण्याच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे पाणी विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, पुणे महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज पुणे च्या अध्यक्षा श्यामला देसाई, ग्रीन हिल्स ग्रुपचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी, रूट स्किल संस्थेच्या संस्थापिका भाविषा बुद्धदेव, अतुल आर्ट चे चित्रकार  अतुल वाघ आधी पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
आपल्या भाषणात पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी म्हणाले की  हवामान बदलासाठी लोकांचा सहभाग हा महत्त्वाचा आहे.डेव्हलपमेंट व पर्यावरण यामध्ये नेहमी विरोधाभास असतो.पुण्यातील पाण्याच्या झऱ्यांचे पुनरुज्जीवन, वायू प्रदूषण कमी करणे, हवामान कृती जे खाते अंतर्गत लवकरच दोन वर्षात मार्गी लावणार आहोत.     आपल्या भाषणात वंदना चव्हाण म्हणाल्या की , सध्या आपल्याला क्लायमेट चेंज सारखे आव्हान असणार आहे. त्यासाठी पर्यावरण वाचवणे महत्त्वाच आहे. वातावरणातून कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेण्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे. राज्यघटनेच्या दुरुस्तीमध्ये पर्यावरणाबाबत महापालिकेच्या जबाबदाऱ्यां काय आहेत हे करण्यात आले होते.पुण्यातील टेकड्या आणि मोकळ्या जागांचे निसर्ग तसेच पुणे नागरिकांच्या आरोग्यासाठी कसे संरक्षण करणे आवश्यक आहे याबद्दल सांगितले. पुण्याच्या पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
या प्रदर्शनाची संकल्पना पाणी, वायू, हवा, पृथ्वी, माती या पंचमहाभूतांवर आधारित आहे.या प्रदर्शनात गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, पुणे जल संवाद, लाईफ ट्री, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज, वन उद्यान संवर्धन वा सेवा, जिवीत नदी, डू सेव्ह, रूट स्किल्स, पीएमसी आणि अतुल आर्ट्स या सर्वसंस्थांनी या प्रदर्शनात भाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीन हिल्स ग्रुप पुणे चे अध्यक्ष संजय  सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण हरणे तर आभार नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज पुणेच्या अध्यक्षा  श्यामला देसाई यांनी मानले.प्रदर्शनात असलेल्या सर्व स्टॉल्सना मान्यवरांनी भेट दिली. या प्रदर्शनात पर्यावरणावर आधारित पेंटिंग फोटो व  पर्यावरण जागृती बाबत मॉडेल व वस्तू ठेवण्यात आले आहेत.या प्रदर्शनात पर्यावरणावर आधारित चित्रकार अतुल वाघ यांचे पेंटिंग ठेवण्यात आले आहेत.  .हे    प्रदर्शन सर्व पर्यावरण प्रेमी साठी 8 जून ते 10 जून 2024 दरम्यान सकाळी 9तेरात्री 8 या वेळेत पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे मोफत खुले असणार आहे. तरी पर्यावरण प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिल्यास रोप व बिया मोफत मिळणार आहे. तसेच ज्यांना पर्यावरणासाठी काम करायचे असेल त्यांनी या प्रदर्शनाला  पुणेकर नागरिकांनी अवश्य भेट द्यावी पर्यावरणासाठी काम करण्याची ही  एक नामी संधी आहे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

Leave A Reply

Translate »