सन्मती बाल निकेतन संस्थेतील ”तू ‘झेप’ घे तेजाकडे” या उपक्रमाचा समारोप

पुणे : ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री महर्षी डॉ.सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांनी स्थापन केलेल्या ‘सप्तसिंधू’ महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित ‘सन्मती बाल निकेतन’, मांजरी या संस्थेत 2 ते 31 मे 2024 दरम्यान तू ‘झेप’ घे तेजाकडे हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध घटकांवर कार्यशाळा झाल्या, या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी मागील शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा, शिक्षणात यश संपादन केलेल्या मुलांचा तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

तू ‘झेप’ घे तेजाकडे या उपक्रमाचा समारोप आज जसविंदर नारंग (सीईओ, विलू पूनावाला फाउंडेशन), रोहित शिंदे (सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया), राहुल सावंत (सीएसआर विभाग, कल्याणी टेक्नोफोर्ज प्रा.), विजय कोल्हटकर (सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया), प्रवीण शिर्के (वरिष्ठ व्यवस्थापक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया), ममता सिंधुताई सपकाळ (अध्यक्षा,’सप्तसिंधू’ महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था ), दिपक गायकवाड (अध्यक्ष, वनवासी गोपाळकृष्ण बहुदेशीय मंडळ), विनय सपकाळ (अध्यक्ष,मदर ग्लोबल फाउंडेशन) मनीषा नाईक (सीएसआर प्रमुख, माई परिवार) आदि मान्यवर उपस्थित होते.

एक महिना सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना भाषण व संभाषण कौशल्य , मोडी लिपी, ट्रेकिंग, प्रथमोपचार व आपत्ति व्यवस्थापन, मैदानी खेळ आणि व्यक्तिमत्व विकास, आहाराचे महत्त्व, नृत्य, करिअर मार्गदर्शन, व्यावसाय मार्गदर्शन , मी आणि माझा स्व – स्व ची ओळख, संगणक ओळख, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ब्रेन जीम, गोल सेटिंग, वैदिक गणित अशा वैविध्यपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. शशांक मोहिते, श्वेता ठाकूर, प्रमोद सोनवणे, सी.प्रकाश, संदीप भापकर, मंजिरी कुलकर्णी, निनाद शिंदे, रौनक सिंग, पल्लवी मोहाडीकर, सीमा पोटे, दिनेश शेटे, संदीप खांदेवाले, रमेश रुणवाल, स्वप्नील खोत, अश्विनी कासार, मनिषा नाईक, अर्चना अकुला, विशाल वाडये, कृष्णा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

समारोप कार्यक्रमात संस्थेतील विद्यार्थ्यांनी त्यांना या उपक्रमातून काय शिकायला मिळाले याबाबत मराठी, हिंदीसह इंग्रजीत मनोगत व्यक्त केले.

हे शिबीर यशस्वी होण्याचे श्रेय संस्थेतील मुले आणि कर्मचारी वर्ग यांचे आहे असे ममता सिंधुताई सपकाळ यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता ठाकूर यांनी केले तर आभार बालाजी दराडे यांनी मानले.

Leave A Reply

Translate »