भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा नवा धर्म निर्माण होईलप्रा.गोविंदन रंगराजन यांचे प्रतिपादनः एमआयटी डब्ल्यूपीयूत

२८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालाचे उद्घाटन

पुणे,दि.२४ नोव्हेंबर: ” जस जसे अर्टिफिशियल इंटेलिजेन्स अधिक अत्याधुनिक आणि व्यापक होत आहे तसे तसे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्या धोक्यांपासून चेतावणी देणारे आवाजही मोठे होत आहे. परंतू भविष्यात कृत्रिम बुध्दीमत्तेचा नवा धर्म निर्माण होण्याचे चिन्हे दिसत आहे.”असे प्रतिपादन बंगलूर येथील पब्लिक युनिव्हर्सिटीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक प्रा.गोविंदन रंगराजन यांनी व्यक्त केले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


यावेळी जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार व गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा व व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.


प्रा.गोविंदन रंगराजन म्हणाले,”एआयने काही प्रमाणात सामाजिक सीमा ओलांडल्या आहेत. वंश, वर्ग आणि इतर श्रेण्यांवर आधारित फरक लक्षता ठेवणे ही महत्वाचे आहे. एआयचे बरेच फायदे आहेत. जसे की आरोग्य डेटा जमा करणे या सारख्या बर्‍याच गोष्टींना ते बळ देते. परंतू एआय सिस्टमचा एक धोका आहे. तो म्हणजे लवकरच आपल्यापेक्षा अधिक हुशार होईल. या मुळे समाजतील प्रतिष्ठित व्यक्तीचे वैयक्तिक जीवन धोक्यात येऊ शकते. आरोग्य सेवेत ही डॉक्टरांना याची मदत मिळेल परंतू त्यासाठी काही कायदे व नियमावली तयार करावे. तसेच चैप आणि जीपीटी सारख्या जेनेरिक साधनांचा झपाट्याने होणारी वाढ ही चिंताजनक आहे. बर्‍याच वापरकर्त्यांनी असाइनमेंट लिहिणे टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ज्यामुळे शैक्षणिक अखंडता आणि सर्जनशीलता धोक्यात आली आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू तुकाराम महाराज यांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देशाने ही व्याख्यानमाला सुरू केली गेले. येथे विचारवंत, धर्मगुरू, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ हे मार्गदर्शन करुन ज्ञान दानाचे कार्य करीत आहेत. सदगुणांची पूजा हीच खरी ईश्वराची पूजा आहे. मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन व्हावे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,” वर्तमान काळात मानवाने मशीनची निर्मिती केली आहे. जीवनात सुख आणि शांती निर्मितीसाठी आध्यात्मिक व आत्मज्ञान ज्ञान गरजेचे आहे. सत्याची परिभाषा समझणे ही गरजेचे आहे.”
डॉ.संजय उपाध्ये म्हणाले, ” दिवाळी नंतर ही ज्ञानाची दिवाळी या व्याख्यानमालेतून सुरू झाली आहे. यातून विचारांबरोबर स्वतःची विवेक बुद्धी जागृत करावी. वर्तमानकाळात मानवाचे शरीर ही यंत्रवत होत असतांना त्यांना कधी काय करावे याचे भान ही राहिले नाही.”
डॉ. मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. याचा मुख्य उद्देश हा विचारांचे शुद्धीकरण करणे आणि व्यक्तीमत्वाचा विकास करणे आहे.
प्रा.डॉ.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. आर.एम,चिटणीस यांनी आभार मानले.

Leave A Reply

Translate »