तौसिफ मोमीन ठरला “पुणे श्री” स्पर्धेचा मानकरी

पुणे – फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे व वाइब्रंस इंटरप्रायझेस यांच्या वतीने आयोजित केलेल्या “पुणे श्री” स्पर्धेत तौसिफ मोमीन विजेता ठरला तर उपविजेता दिव्यांक आरु झाला. बेस्ट पोजर चा किताब विनोद कागडे याने पटकावला. मेन्स फिजिकचा गोकुळ वाकुडे तर महिलांमध्ये शितल वाडेकर विजयी झाले. पुण्यातील शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाची “पुणे श्री” हि स्पर्धा अतिशय दिमाखात व भव्य दिव्य स्पर्धा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे नुकतीच पार पडली.

संगिताच्या तालावर उत्कृष्ठ पोजींगचे प्रात्यक्षिक दाखवून स्पर्धकांनी प्रक्षेकांची मने जिंकली. पुणे स्पोर्टस् फिटनेस कार्निवल ही संकल्पना पुण्यात पहिल्यांदाच पुण्यात यानिमिताने झाली. त्यामुळे अनेक देशी-विदेशी फीटनेस क्षेत्रातील कंपनी या कार्निवलमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कर्निव्हलचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते केतन कारंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे शारीरीक संघटनेचे अध्यक्ष निलेश काळे व वायब्रस इन्टरप्रायझेसचे संचालक प्रसाद जायगुडे, फेडरेशनचे सचिव दिलीप धुमाळ व खजिनदार मयूर मेहेर, विल्यम अब्राहम उपस्थितीत होते. मिस्टर यूनिवर्स संग्राम चौगुले व फीटनेस आयकॉन साहील खान या दोघांच्या उपस्थितीने संपूर्ण प्रेक्षागृहात व खेळांडूमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

“पुणे श्री” च्या माजी विजयी खेळाडूंचे सत्कार मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले व माजी शिक्षणमंडळ अध्यक्ष प्रदिप उर्फ बाबा धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आला. माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, अविनाश बागवे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, दिपालीताई धुमाळ अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू उपस्थित होते.

४० वर्षावरील वयोगटासाठी पहिल्यांदाच स्पर्धा घेण्यात आली होती. महिलांसाठी फिजिक व पुरुषांसाठी फीजिक व बॉडी बिल्डींगची स्पर्धा अशा स्वरुपात ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक चषक, प्रमाणपत्र व गिफ्ट हॅम्पर देण्यात आले होते.

या स्पर्धेदरम्यान दरवर्षी प्रमाणे फेडरेशनच्या वतीने बेस्ट ऑफीशियल अवॉर्ड आरती माळवदे यांना देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण नंदू कलमकर, दिलीप धुमाळ, महेश गणगे, राजेश वाईकर, मयुर मेहेर, नेहा धुमाळ, बंटी निढाळकर यांनी तर सूत्रसंचलन सानिका निर्मल व साहिल धुमाळ यांनी केले. मोहसीन शेख यांनी स्टेज मार्शल म्हणून काम पहिले. 

फेडरेशनच्यावतीने बॉडीबिल्डींग विश्वात पहिल्यांदाच बॉडीबिल्डरचे नाव व्यासपीठाला व गॅलरीला देण्याची प्रथा सुरुवात करण्यात आली. यामध्ये मि. वर्ल्ड महेंद्र चव्हाण यांचे नाव व्यासपीठाला तर इंटरनॅशनल अॅथलिट तुषार गायकवाड यांचे नाव गॅलरीला देण्यात आले होते. त्याचप्रमाणे या मानाच्या ट्रॉफीची पालखी मधून मिरवणूक काढण्यात आली. उत्तम नियोजन, नाविन्यपूर्ण शिस्तबद्ध आयोजन, अचूक परिक्षण, खेळाडूंचा मानसन्मान व मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमुळे ही स्पर्धा आकर्षक ठरली. 

Leave A Reply

Translate »